भारती विद्यापीठ सांगली येथे इन्क्युबेशन सेंटरचे उदघाटन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/03/2025 1:39 PM

  "विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रेरणा देऊन क्रांतिकारक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रत्येक कॉलेज वरती इन्क्युबेशन सेंटरची गरज आहे"असे प्रतिपादन मोटिवेशनल स्पीकर श्रीयुत अमितकुमार चव्हाण यांनी भारती विद्यापीठ सांगली येथील इनक्युबेशन सेंटरच्या उदघाटन प्रसंगी केले.

याप्रसंगी सिनिअर मॅनेजमेंट कन्सल्टंट अमेरिका येथून विनया गोरे, डॉक्टर अतुल अय्यर पुणे, श्रीयुत कैलास पाटील सांगली, श्रीयुत तुषार मुंदडा सांगली आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पल्लवी जमसंडकर, डॉक्टर प्रताप देसाई व डॉक्टर अमरजा नरगुंदे व भारती विद्यापीठ सांगली यांच्यातर्फे करण्यात आले.

श्रीयुत अमितकुमार चव्हाण हे भारती विद्यापीठ सांगलीचे मॅनेजमेंटचे स्टार ॲल्युमिनी असून याच कॉलेजमधून त्यांनी एम.बी.ए. ची डिग्री प्राप्त केली आहे. या उद्घाटन प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून त्यांना बोलवण्यात आले होते.

Share

Other News

ताज्या बातम्या