अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी येथील पंचफुलाबाई हरणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 8 मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून माता-पालक सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाकरिता प्राचार्य जयश्री कळमकर, कोण बनेगा करोडपती विजेता सौ बबीता ताई ताडे, हाडोळे मॅडम, सौ मंदाताई लांजेवार, सौ गीता ताई थोरात उपस्थित होत्या सर्वप्रथम विद्यालयाच्या शिक्षिका यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर माता पालकांना मार्गदर्शन केले. नंतर काही महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाकरिता मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये सौ बबीता ताई ताडे, सौ मंदाताई लांजेवार, श्रीमती अरुणा गव्हाळे तसेच श्रीमती वर्षा करस्कार यांनी आपल्या मनोगतामध्ये स्त्रियांनी न घाबरता सर्व क्षेत्रांमध्ये काम करावे आज सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या कर्तव्याने स्त्रिया काम करत आहे आणि आपल्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहे स्त्रिया विषयी आदर तसेच कर्तुत्वान महिलांच्या जीवनामध्ये झालेला संघर्ष यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रास्ताविक व आयोजन श्रीमती अरुणा गव्हाळे, श्रीमती वर्षा करस्कार, श्रुती चौखंडे यांनी केले या कार्यक्रमाकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते