मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांची मिरज जंक्शन येथे सल्लागार समिति सदस्य व रेल्वे प्रवासी संस्था मिरजच्या पदाधिकार्‍यांनी घेतली भेट...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/03/2025 11:19 AM

*विविध मागण्याचे निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली*

* *मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी मिरज जंक्शन येथे आले असताना रेल्वे सल्लागार समिती सदस्य व रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन चे पदाधिकारी यांनी त्यांची घेतली यावेळी मध्य रेल्वे चे पीसीओ शामसुंदर गुप्ता मध्य रेलवे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा मध्य रेल्वे पुणे विभागाची एस डी ओ एम डॉ. रामदास भिसे आदी उपस्थित होते* 

*यावेळी कोल्हापूर कलबुर्गी इंटरसिटी एक्सप्रेस सकाळच्या सत्रामध्ये सुरू करण्यात यावे व मिरज मधून हैदराबाद व चेन्नई या ठिकाणी नवीन गाडी सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.*

*यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी लवकरच सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर कलबुर्गी इंटरसिटी एक्सप्रेस व कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस सुरू करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मिरज मधून हैदराबाद व चेन्नई साठी व्हाया सोलापूर मार्गे हॉलिडे स्पेशल  एक्सप्रेस सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.*

 *मार्च अखेर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे मधून सुटणाऱ्या काही गाड्यांचा मिरज पर्यंत विस्तार केला जाईल असेही त्यांनी सांगितले.*

 *शेडबाळे येथे होणाऱ्या जंक्शन संदर्भात प्रश्न उपस्थित केले असताना 1992 साली मिरज आथनी बिजापूर या मार्गाचा सर्वे झालेला असून हा मार्ग शेडबाळ येथून सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले भविष्यामध्ये मिरज अथणी बिजापूर हा मार्ग अस्तित्वात आल्यास तो मार्ग शेडबाळा येथूनच जाईल असे त्यांनी सांगितले*

 *मिरज जंक्शन च्या" मॉडेल स्थानक" संदर्भात विचारले असता या कामाचा सर्वे नुकताच पूर्ण झालेला असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.*

 *मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, रेल्वे प्रवासी संस्था, मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजू पाटील,वाय.सी.कुलकर्णी, गणेश घोरपडे, तुषार शिंदे, सोपान भोरावत, सुरेश मसुरकर, लखन भोरे, कुंदन भोरावत आदींनी या मागण्यांचे निवेदन दिले*.

Share

Other News

ताज्या बातम्या