शुद्ध पाणी मिळण्याचा सांगलीकरांना अधिकार : सतिश साखळकर, नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/03/2025 9:00 AM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये खासदार विशाल दादा पाटील यांच्याकडे आमच्या नागरिक जागृती मंचच्या वतीने वारणा उद्भव योजना कशी चुकीची आहे याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला होता त्या अनुषंगाने खासदार विशाल दादा पाटील यांनी महानगरपालिका मुख्यालयात माननीय आयुक्त व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 रोजी मीटिंग घेण्यात आली.
सदर मिटिंग मध्ये खासदार साहेबांनी वारणा उद्भव योजना फायदे तोटे यातील अडचणी समस्या तसेच चांदोली धरणातून थेट पाणी आणणे योजनेबाबतीतील माहिती व सध्या कृष्णा नदीवरून पाणी उपसा बाबत सर्व माहिती विचारले असता काही माहिती बाबत माहिती देण्यात आली नाही किंवा अर्धवट माहिती होती याबाबत संपूर्ण अहवाल खासदार साहेबांनी तात्काळ देण्याचे आदेश दिलेले आहे.
कोणतीही योजना राबवत असताना त्याबाबत सर्व अंगाने अभ्यास करून शुद्ध पाणी सांगलीकरांना मिळाला पाहिजे याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये शुद्ध पाणी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मिळाला पाहिजे याबाबत खासदार साहेबांनी योग्य ते आदेश दिलेले आहे .
काल दैनिक पुढारी मध्ये म्हैसाळ बॅरेज बद्दल डिटेल बातमी आलेली आहे  ती व्यवस्थित वाचून अभ्यास करावा
यावरून तरी मनपा अधिकारी यांनी वास्तव तपासून बघावे आणि सदर योजनेचा हट्ट का व कशासाठी चालू आहे का कोणाच्या आर्थिक भल्यासाठी चालू आहे याचा विचार करावा अशी पुनश्च एकदा विनंती आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या