*कुपवाड मधील राणाप्रताप मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू अक्षय आनंदा मासाळ याची आखिल भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली*
*दि. २१ ते २३ मार्च, २०२५ या कालावधीत दिल्ली याठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस खो-खो स्पर्धेसाठी राणाप्रताप तरुण मंडळाचा राष्ट्रीय खो-खो खेळाडू अक्षय आनंदा मासाळ याची रिजनल स्पोर्ट्स बोर्ड, मुंबई या संघात अभिनंदनीय निवड झाली आहे.*
*या वेळी मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, रमेश पाटील, संतोष कर्नाळे, प्रा.सचिन चव्हाण, संजय हिरेकुर्ब, महेश कर्नाळे,शिवसागर पाटील, विशाल बन्ने अभय सुतार, धनंजय पाटील, शेखर स्वामी आदिनी अक्षय मासाळ यास पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.*