प्रा.अरुण भालेराव यांना भोपाळ विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान
भगूर(वार्ताहर) पुणे येथील तळेगाव दाभाडे बीएसटीआर संस्थेच्या मिमर & डॉक्टर हाँस्पिटलचे वरीष्ठ ग्रथपाल
प्रा.अरुण लक्ष्मण भालेराव यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात " A Study on uses of Library Resources and services in NAAC Accredited selected Engineering College Libraries in Maharashtra " या विषयावर 213 अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यास केला श्री सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायन्स भोपाळ या विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे यामधीलक्ष संशोधनात त्यांना डॉ.नंदकिशोर पाटीदार हे मार्गदर्शक म्हणून लाभले. तसेच डॉ.सुरेशकुमार बाबू डॉ. संभाजी पाटील हे परीक्षक होते.संशोधन कार्यात डॉ. ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेच्या डायरेक्टर डॉ.सुचित्रा नागरे प्राचार्य डॉ.संध्या कुलकर्णी व डॉ.सचिन नाईक व डॉ. तुषार खाचणे प्रा.जावेद खान यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केले.तसेच
आय सी एस एस आर या संस्थेने प्रा.अरुण भालेराव यांना बेस्ट लायब्ररीयन ऑफ इंडिया अवॉर्ड द कॅटेगिरी प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड 2022 मध्येही सन्मानित केले होते.