आता लोकप्रतिनिधीच्या नादाला लागायच नको...
मिरजकर म्हणूनच आपल्यालाच काहीतरी करावं लागेल...
मिरज जंक्शनचे महत्व कमी होणार ? काय आहे कारण ?
आपण जाणतोच की भारतभर सर्वाधिक सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास… मात्र अद्यापही काही भागात रेल्वे पोहोचली नाही तर काही भागात हव्या त्या स्थळी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध नाहीत. ऐतिहासिक वारसा असलेल्या सातारा मधून देशाची राजधानी म्हणजेच दिल्लीला जाण्यासाठी आता अनेक समस्या उद्भवू शकतात. कारण रेल्वे मंत्रालयाच्या दक्षिण पश्चिम रेल्वे कडून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या शेडबाळ मध्ये नवीन जंक्शन उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. याचा फटका साताऱ्यातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.
मिरज ,कोल्हापूर ला सुद्धा फटका
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने दक्षिण पश्चिम रेल्वे कडून शेडबाळ मध्ये नवीन जंक्शन उभारण्याचं काम मोठ्या जोमानं सुरू आहे. याबरोबरच नव्याने बेळगाव सोलापूर रेल्वे मार्गाच्या कॉड लाईन रेल्वे मार्ग करण्याची मागणी दक्षिण पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शेडबाळ रेल्वे स्थानकाचे जंक्शन झाल्यास बेळगाव सोलापूर रेल्वे मार्गावर कॉडलाईन रेल्वे मार्ग झाला तर मिरज जंक्शन आणि कोल्हापूर रेल्वे टर्मिनस सहभाग पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहेत.
सध्याची स्थिती पाहायला गेलं तर मिरज रेल्वे जंक्शन वरून पुणे कोल्हापूर आणि बेळगाव या चार मार्गावर रेल्वे धावत आहेत. मिरज जंक्शनवर सहा फलाट आहेत. मिरज रेल्वे स्थानकातून मिरज ते दिल्ली, मिरज ते बिकानेर अशा रेल्वे धावत असतात. तसेच निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस, यशवंतपुर निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस, यशवंतपुर चंदिगड सुवर्ण क्रांती एक्सप्रेस, म्हैसूर निजामुद्दीन सुवर्ण क्रांती एक्सप्रेस, वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस, यासह जवळपास 60 पेक्षा जास्त पॅसेंजर आणि मालगाड्यात ये जा करत असतात.
मिरज जंक्शनचे महत्व कमी होणार ?
सध्याच्या स्थितीला शेडबाळचे नवीन जंक्शन करण्याचं काम हे अंतिम टप्प्यात आलं असून या रेल्वेस्थानकावरून बेळगाव रेल्वे मार्गे सोलापूर रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी बेडग, बालवड मार्गे ऑनलाइन मंजूर करण्याची परवानगी मागितली आहे. या ठिकाणी दक्षिण पश्चिम रेल्वेला कॉडलाईन मंजूर झाल्यास शेडबाळ स्थानकावरून थेट सोलापूर विभागाच्या रेल्वे मार्गाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे मिरज जंक्शनचे महत्व पूर्णपणे कमी होणार आहे. जर शेडबाळ मध्ये जंक्शन झालं तर मिरज, कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, कोरेगाव, वठार स्टेशन, लोणंद, नीरा, जेजुरी, सासवड मार्गावरील रेल्वे वाहतुकीला याचा मोठा फटका बसणार आहे. मिरज सांगली सातारा मार्गे रेल्वे गाड्या बंद झाल्यास दक्षिणेत आणि उत्तरेत जाण्यासाठी प्रवाशांना शेडबळला जावे लागेल. यामध्ये प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसणार आहे. याशिवाय प्रवाशांचा वेळ आणि खर्चही वाढणार आहे. एवढेच नाही तर सांगली मिरज सातारा व कराड इथून देशाच्या राजधानी जाण्यासाठी एकही रेल्वे उपलब्ध होणार नाही. त्यामुळे प्रवाशांचे फार मोठे नुकसान होणार आहे.