दुर्गापूर पोलीस ठाण्यातील संपूर्ण परिसरात खूप मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहे जसे की अवैध दारू विक्री, सट्टा पट्टी, तसेच गांजा तसेच अनेक अवैध धंदे सुरु आहे. तसेच वेळे चा आधी बार आणि देशी दारू चे दुकान सुद्धा सुरु करून ते रात्री उशिरा पर्यंत हे दुकानें सुरु असतात.त्या मुळे परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे ह्या गुन्हेगारी मुळे खून सुद्धा झाले आहे, ह्या मुळे सर्वं सामान्य लोकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि ह्या मध्ये पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ह्या गंभीर विषयाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष बब्बू इसा शेख ह्यांच्या नेतृत्वात आज दिनांक 7/3/2025 ला दुर्गापूर पोलीस स्टेशनं चे ठाणेदार मा प्रकाश राऊत साहेब ह्यांना निवेदन देऊन ह्या अवैध्य प्रकारे सुरु असणाऱ्या धंद्यावर चर्चा करण्यात आली. लवकरच ह्या सर्वं अवैध धंदे करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन ठाणेदार कडून देण्यात आले.
दुर्गापूर पोलीस स्टेशनं अंतर्गत सुरु असणारे सर्वं अवैध धंदे ताबडतोब बंद न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने तिर्व आंदोलन करण्याचा इशारा अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष बब्बू इसा शेख च्या वतीने देण्यात आला.
निवेदन देते वेळी चंद्रपूर महासचिव मोहन सिंग ठाकूर, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष नजमा शेख, विभाग अध्यक्ष सैय्यद नूर भाई, बशीर भाई, , मुजीब भाई, अजीम भाई, अहमद भाई अज्जू शेख, जलील भाई,इत्यादी पदाधिकारी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.