कोरेगाव ता वाळवा येथे पार पडलेल्या किशोर-किशोरी सांगली जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धेत कुपवाडच्या राणाप्रताप मंडळाच्या किशोर संघाने स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले तर किशोरी संघाने उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील किशोर गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सार्थक हिरेकुर्ब, उत्कृष्ट संरक्षक म्हणून सोहम पाडळे, तर किशोरी गटातील उत्कृष्ट आक्रमक म्हणून अंजली वाघे याना गौरविण्यात आले.
विजयी संघातील खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक यांचे मनःपूर्वक अभिनंदन...