*ति.झ. विद्यामंदिर शाळेत ७० वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरी संपन्न*
*भगूर (वार्ताहार)*
येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित ति.झं.विद्यामंदिर शाळेचा ७० वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले .
*कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी राजेंद्र विभांडीक(निवृत्तपोलीस निरीक्षक) व (स्थापत्य अभियंता व उद्योजक भगूर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक बलकवडे हे* ; तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष विश्वास बोडके होते.
*प्रमुख पाहुण्यांनी शालेय आठवणींना उजाळा देऊन शाळेच्या संस्कारामुळेच आपण आयुष्यात प्रगती करू शकलो असे मत व्यक्त केले .विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करावा ,आवडत्या क्षेत्रात करिअर करा, भरपूर संधी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. जिद्द चिकाटी व सातत्य ठेवून वाचन, लेखन, खेळ यावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेच्या वतीने पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार स्वागत करण्यात आले.
*यावेळी व्यासपीठावर संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, माजी पोलीस उपायुक्त राधाकृष्ण गामणे, मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते,शाळा समिती सदस्य अरुण चव्हाण, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, उमेश कुलकर्णी, माजी तुरुंग निरीक्षक बलवंत काळे, माजी नायब तहसीलदार बापूसाहेब वाघ, माजी विद्यार्थी कामगार नेते प्रशांत कापसे हे उपस्थित होते .
पाहुण्यांच्या हस्ते हस्ते शालांत परीक्षेत व इयत्तावार प्रथम आलेले आलेले विद्यार्थी , शालांत परीक्षेत संपादन केलेले विद्यार्थी व विविध राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडू व विद्यार्थीना पारितोषिके पालक शिक्षक संघाच्या वतीने शैक्षणिक साधने व देणगीदारांनी रोख रकमेचे बक्षिसे देऊन प्रदान करण्यात आली .
यावेळी प्रमुख पाहुण्यासंह विश्वास बोडके, शैलेश पाटोळे यांची भाषणे झाली.
कार्यक्रम प्रसंगी संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे, सहकार्यवाह उमेश कुलकर्णी, दिनेश देवरे, दिलीप अहिरे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. रुपाली उचाडे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना आडके, माजी मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, शाळा समिती सदस्य रत्नाकर बकरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिवाजी सोनवणे, अरुण चव्हाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती. उषा आव्हाड यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय हेमंत काशीकर यांनी करून दिला . पारितोषिक निवेदन व यादी वाचन कुंदन गवळी यांनी केले . तसेच संदिप पाटील यांनी आभार मानले.
त्यानंतर प्राथमिक विद्यामंदिर, ति.झं.विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास टोपले, रविंद्र नाकील, सौ. विजया चतुर, महाजन सर, कुंदन गवळी, हेमंत काशीकर, संदीप पाटील,विलास कडाळे , श्रीमती माया सिसोदे , सुनील शेटे, दिगंबर माळी, चीमा सापटे, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले .
यावेळी माजी विद्यार्थी, पालक परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.