मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वणी तालुका सचिवपदी गजानन ताकसांडे यांची निवड

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 31/12/2024 7:56 PM

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वणी तालुका सचिवपदी गजानन ताकसांडे यांची निवड

वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संविधानिक नियमानुसार शाखा ते राष्ट्रीय स्तरावर दर तीन वर्षांनी अधिवेशने घेऊन मागील तीन वर्षाचा पक्षाच्या कार्याचा लेखाजोखा वर विचारमंथन करून पुढील तीन वर्षासाठी नवीन कमिटीची निवड करून पुढील वाटचाल केल्या जाते. ह्या नियमानुसार लोकशाही पद्धतीने वणी येथील नगाजी महाराज सभागृहात तालुका अधिवेशन घेऊन कॉ. गजानन ताकसांडे यांची तालुका सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.

या अधिवेशनाचे सुरुवातीला कष्टकऱ्यांच्या विळा हातोडा चिन्ह असलेल्या लाल झेंड्याचे ज्येष्ठ कार्यकर्ता बापूजी येरकडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व शहिदांना तसेच कॉ. सीताराम येचुरी, कॉ.बुद्धदेव भट्टाचार्य, कॉ.शंकरराव दानव व अन्य पुरोगामी नेत्यांना, कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

या अधिवेशनाचे कार्य चालविण्यासाठी कॉ. मनोज काळे, गजानन ताकसांडे, कवडू चांदेकर व संजय वालकोंडे यांचे अध्यक्षमंडळ बनविण्यात आले. यानंतर तालुका सचिव कॉ. ॲड. दिलीप परचाके यांनी मागील तीन वर्षाचा राजकीय, संघटनात्मक अहवाल सादर केला. या अहवालावर अनेक कार्यकर्त्यांनी साधक बाधक मते मांडून या अहवालाला मंजुरी दिली. यानंतर जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी उपस्थित अधिवेशनातील पक्ष प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. 

यानंतर पक्षाचे तालुक्याचे कामकाज चालविण्यासाठी १७ सदस्यीय नवीन कमिटीची एकमताने निवड करण्यात आली. या निवडलेल्या तालुका कमिटी मधून तालुका सचिव म्हणून कॉ. गजानन ताकसांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या अधिवेशनाला ७८ पुरुष तर १६ महिला प्रतिनिधी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या