शेटे महाविद्यालयात प्राध्यापिका डॉ अंकिता रायते यांची संशोधन पेपर व पेटंट अधिकार याविषयी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
श्री एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात Research Methodology and Intellectual Property Rights one day workshop चे आयोजन करण्यात आले होते. वर्कशॉप दोन सत्रात घेण्यात आले. पहिल्या सत्रामध्ये जी. एम .डी . कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय सिन्नर येथील प्राध्यापिका.अंकिता रायते यांनी Intellectual Property Rights या विषयावर मार्गदर्शन केले त्यांनी सर्वप्रथम बौद्धिक संपदा अधिकार कोणकोणते आहेत हे सविस्तरपणे सांगितले त्यानंतर त्यांनी पेटंट काय असतं, पेटंट कशा पद्धतीने केले जाते तसेच पेटंट केल्याचे कोणकोणते फायदे आहेत पेटंट करण्याची प्रक्रिया कशी आहे हे सविस्तरपणे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात डॉ.राजू सानप यांनी Research Methodology या विषयावर मार्गदर्शन केले रिसर्च वर बोलत असताना त्यांनी रिसर्च चे प्रकार सविस्तरपणे सांगितले रिसर्च करताना घ्यावयाची काळजी रिसर्च साठी टॉपिक कशा पद्धतीने निवडला पाहिजे रिसर्च पेपर कशा पद्धतीने तयार केले पाहिजे याबद्दल मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केले. सेशनच्या शेवटी त्यांनी विद्यार्थी तसेच सर्व प्राध्यापकांना पडलेल्या प्रश्नांचे व्यवस्थितपणे निरसन केले. दोन्ही वक्त्यांनी सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मृत्युंजय कापसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता जोशी यांनी केले तसेच अश्विनी ठाकरे यांनी आलेल्या वक्त्यांचे आभार मानले.