आगीत संसार उघड्यावर आलेल्या गोदावरी वाघमारे यांना आ. बोंढारकरांनी दिला आधार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 29/12/2024 6:20 PM

नांदेड : बळीरामपूर येथील गोदावरी शेषराव वाघमारे यांच्या घरास आग लागून त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली होती . अक्षरशः गोदावरी वाघमारे यांचा संसार उघड्यावर आला होता. अशा परिस्थितीत गोदावरी वाघमारे यांना आधार देण्यासाठी आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी वाघमारे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना थेट आर्थिक मदत करत साडी चोळी ही केली . त्यामुळे आ. बोंढारकर यांच्या या सामाजिक बांधिलकीची जोरदार चर्चा होत आहे. 
बळीरामपूर येथील गोदावरी शेषराव वाघमारे यांच्या घराला काल आग लागली होती .  या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. एक वेळचे जेवण तयार करता येईल इतके साहित्य ही शिल्लक उरले नव्हते . कपडे , धान्य व घरातील सर्व इतर जीवनावश्यक साहित्याची होळी झाल्याने गोदावरी वाघमारे यांचा संसार अक्षरशः बेचरा झाला होता . अग्निशमक दलाने आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन आग विझवली . यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनीही आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला होता.  आग आटोक्यात येईपर्यंत घरातील  सर्व साहित्याची राखरांगोळी झाली होती.या  घटनेची माहिती मिळताच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी वाघमारे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली . त्यांना धीर देत रोख मदत केली. भविष्यातही काही अडचण असल्यास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास देत खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील अडचणीच्या काळात बहिणीच्या पाठीशी उभा राहणारा खऱ्या भावाची भूमिका पार पाडली. यावेळी जिल्हाप्रमुख उमेश मुंडे , तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या