कोल्हापूर रोड चौपदरीकरणाचे काम गटारीसाठी थांबवणे चुकीचे : सतिश साखळकर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/10/2024 11:27 AM

सांगली कोल्हापूर रोड आदिनाथ मंगल कार्यालय ते शास्त्री चौक सदर रोडवर गेल्या तीन-चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात अपघात घडत होते लाईटची सोय नव्हती चौकास सिग्नल नव्हते तसेच स्पीड बेकर वजा रबलिंग नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना हाल अपेष्टा सोसाव्या लागत होत्या.
सर्व पक्षी कृती समितीच्या वतीने सदर भागातील नागरिकांची व्यापक मीटिंग पार पडली त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे पंधरा दिवसाचा अवधी देऊन इशारा देण्यात आला होता व मोठ्या प्रमाणात शेकडो महिला आभाळ वृद्ध यांना बरोबर घेऊन दोन अडीच तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी कार्यकारी अभियंता यांनी सदर आंदोलनाच्या ठिकाणी आम्हाला लेखी उत्तर दिलेले होते राज्याच्या बजेटमध्ये सदर रस्त्याच्या प्रस्ताव पाठवण्यात येईल व तो तात्काळ मंजूर करून घेतो 
तसेच पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेली होती.
त्यानंतर सदर रस्ता टेंडर प्रक्रिया राबवून मंजूर करण्यात आलेला होता.
त्याचे साधारण अंदाजपत्रक 18 कोटी रुपयांची असून काम सुरू करण्यात आले आहे 
ज्यावेळी सदर रस्ता मंजूर करण्यात आला त्यावेळी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांची भेट घेतली व संपूर्ण रस्त्याची माहिती घेतली.
त्यामध्ये शंभर फुटी रोड ते शास्त्री चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी मंजूर करण्यात आलेले आहेत सदर गटारीचे अंदाजपत्रक हे पाच कोटीचे आहे.
मात्र शंभर फुटी पासून ते अंकलीपर्यंत दोन्ही बाजूच्या शेतातील पाणी साचून राहते ही फार मोठी समस्या गेल्या कित्येक वर्षापासूनचे आहे 
याबाबत कार्यकारी अभियंता यांना आम्ही अवगत केले व दोन्ही बाजूच्या गटारींची लांबी वाढवण्याची विनंती केली.
त्याबाबत तात्काळ कार्यकारी अभियंता यांनी येणाऱ्या बजेटमध्ये त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे त्याचा सर्व पाठपुरावा आम्ही करत आहोत.
सदर रस्ता चार पदरी होणे किती गरजेचे आहे याबाबत स्थानिक नागरिकच याबाबत सांगू शकतात त्यांना रोज कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते,
याचा अर्थ तिथल्या शेतकऱ्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत असं आमचं म्हणणे नाही कारण गटार झाली पाहिजे त्यांच्या शेतातील पाणी निचरा झालं पाहिजे ही त्यांची मागणी रास्त आहे मात्र चालू असलेल्या कामाला विरोध करून आपण आपली मागणी पूर्ण करून घेण्यात अर्थ नाही कारण गटारी नाहीत म्हणून काम बंद केले तर पूर्वी आमच्याकडे कागदपत्री पुरावा आहे हजारो अपघात झालेले आहेत व शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहे याला जबाबदार कोण?
तरी वरील सर्व बाबींचा विचार करून आपण काम चालू ठेवा सदर काम पूर्ण करून घेऊया व पुढच्या गटारीचा प्रस्ताव पाठवलाय तो आचारसंहितांच्या नंतर तात्काळ मंजूर करून आणूया यासाठी सगळ्यांनी ताकद लावून काम करावे असे मला वाटते.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या