खड्डा की आधुनिक कचराकुंडी????

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/10/2024 9:19 PM

  गेले तीन महिने १०० फुटी रोडवरील खड्डा इतका लोकप्रिय झाला आहे की, आता त्याला महापालिकेने 'कचराकुंडी सन्मान' दिला आहे!का? खड्डा एवढा सन्माननीय आहे की महापालिका प्रशासनाने विचार केला, "दुरुस्ती नको, कचरा टाका!" चारही बाजूंनी बेरागेटिंगर करून त्याचं उद्घाटनही केलं गेलंय.का?

आता या नव्या *'स्मार्ट कचराकुंडी'*वरून नागरिक विचारतायत, "खड्डा कधी बुजणार?" तर महापालिका प्रशासनाकडून  उत्तर येतंय, "आम्हाला अजून त्याचे फुलपॅकेज प्लॅनिंग करायचंय!"

दरम्यान, काही जण आता अंदाज लावतायत की कदाचित पुढचं नवीन प्रोजेक्ट 'खड्डा पर्यटन' असू शकतं, ज्यामध्ये खड्ड्याच्या बाजूने कचराकुंडी पाहायला पर्यटक येतील.

तर, सांगलीच्या नागरिकांनी सुचवलंय की, "आम्ही खड्डा विसरलो नाहीय, पण तुम्ही तरी त्याला नेहमीचं स्वरूप द्या!" मनोज भिसे - अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या