सत्तर वर्षापासून आश्वासनांचा पूर उदंड झाला.... : मनोज भिसे, लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/10/2024 1:06 PM

*"हा आलो, तो गेला, तो गेला न हा आला.*
*सत्तर वर्षापासून आश्वासनांचा पूर उदंड झाला*. 
*पण तिथेच उभा आहे शेरीनाला.*
*म्हणतोय मै झुके गा नहीं साला"*                                                   

*"विधानसभा निवडणुकीचा चांगलाच चढलाय रंग*
*नेते मंडळी आहेत तिकीट मिळवण्यात दंग*
*गल्लीबोळात कुत्र्यांनी केलंय वातावरण तंग*
*प्रत्येक रस्त्यावर खड्डा आहे तुमच्या संग*.
*कोण बांधणार आहे का नाही समस्या सोडवण्यासाठी चंग*

*"किती पण लावली विकासाची गाणी*
*तरीपण नळाला येतय अळी मिश्रित पाणी.*
*गल्लीबोळात रोज आहेत समस्यांची रडगाणी*.
*काय माहित कधी होणार जनता शहाणी"*

*"तुमच्या राजकारणात जनतेला नाही रस* 
*बास करा आता  आश्वासने बोगस*
*लोक कल्याणासाठी लागू दे तुमच्या नेतृत्वाचा कस*. 
*सांगलीकरांना द्या विकासाची लस"*

*मनोज भिसे-अध्यक्ष,लोकहित मंच,सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या