राज्यस्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेत पुणे विभागाचे वर्चस्व

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/10/2024 6:18 PM

नांदेड  : नांदेड येथील गुरुगोबिंद सिंह जी जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या (आर्चरी ) स्पर्धेत पुणे विभागाने अनेक गटात वर्चस्व गाजवले आहे.

 आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड संयुक्त विद्यमाने व नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशन यांचे सहकार्याने सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय आर्चरी (14,17,19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम, नांदेड येथे सूरु आहे .
.
या स्पर्धेत 10 आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले आहेत. तर 04 आंतरराष्ट्रीय पंच व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पंच म्हणुन सेवा करीत आहेत. या स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी झालेल्या सामन्याचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.

14 वर्षे मुले- कम्पाऊंड राऊंड- 50 मी- प्रथम- इर्शान शहा (पुणे), द्वितीय- प्रसाद लप्त (कोल्हापूर), तृतिय-आदित्य पवार (पुणे) 
50 मी द्वितीय- परमाल देशपांडे (पुणे), आदित्य पवार (पुणे), इर्शान शहा (पुणे), ओव्हर ऑल- इर्शान शहा (पुणे), परमाल देशपांडे (पुणे), आदित्य पवार (पुणे), तर टिम मध्ये प्रथम- पुणे, द्वितीय- नागपूर, तृतिय- अमरावती.

14 वर्षे मुली- कम्पाऊंड राऊंड- 50 मी- प्रथम- वैधी जाधव (पुणे), द्वितीय- सोमय्या फडतारे (कोल्हापूर), तृतिय- प्रांजल नरवाडे (अमरावती), 
50 मी द्वितीय- वैधी जाधव (पुणे),अक्ष शिरगांवकर (कोल्हापूर), सोमय्या फडतारे (कोल्हापूर),  ओव्हर ऑल- वैधी जाधव (पुणे), सोमय्या फडतारे (कोल्हापूर),  प्रांजल नरवाडे (अमरावती), तर टिम मध्ये प्रथम- पुणे, द्वितीय- कोल्हापूर तृतिय- नागपूर.

14 वर्षे मुले- रिकव्हर राऊंड- 60 मी- प्रथम- आदित्यराज पगारे (मुंबई), द्वितीय- सार्थक थिळे  (अमरावती), तृतिय- विराज गवस (पुणे)  
14 वर्षे मुले- रिकव्हर राऊंड- 50 मी- प्रथम- विराज गवस (पुणे), द्वितीय- वेदांत वानखेडे (क्री.प्रबोधिनी), तृतिय- सार्थक डांगे (क्रीडा प्रबोधीनी) 
14 वर्षे मुली- रिकव्हर राऊंड- 60 मी- प्रथम- वेदीका वाघ (कोल्हापूर), द्वितीय- वैष्णवी कुलकर्णी  (नाशिक), तृतिय- रेश्मा लोकरे (पुणे) 

14 वर्षे मुली- रिकव्हर राऊंड- 50 मी- प्रथम- वैष्णवी कुलकर्णी (नाशिक), द्वितीय- वेदीका वाघ (कोल्हापूर), तृतिय-रेश्मा लोकरे (पुणे) 

17 वर्षे मुले- कम्पाऊंड राऊंड- 50 मी- प्रथम- शारवील माने (कोल्हापूर), द्वितीय- कापीस सतगरे (पुणे), तृतिय- स्वरीत धवन (पुणे) 

50 मी द्वितीय- बुध्देश्वरराव करी (कोल्हापूर), अर्जन कानसे (कोल्हापूर), सुजित गायकवाड (पुणे) ओव्हर ऑल- शारवील माने (कोल्हापूर), बुध्देश्वर करी (कोल्हापूर), कापीस सतघरेर (पुणे), तर टिम मध्ये प्रथम- कोल्हापूर, द्वितीय- पुणे, तृतिय- अमरावती.

17 वर्षे मुली- कम्पाऊंड राऊंड- 50 मी- प्रथम- प्रतिका प्रदिप (पुणे), द्वितीय- समृती विरप्पे (पुणे), तृतिय- वैष्णवी पाटील (कोल्हापूर), 50 मी द्वितीय- हिमांशी डिसेजा (छ.संभाजीनगर), प्रतिका प्रदिप (पुणे), वैष्णवी पाटील (कोल्हापूर ) ओव्हर ऑल- प्रतिका प्रदिप (पुणे), हिमांशी डुसेजा (छ.संभाजीनगर), स्मृती विपरे (पुणे), तर टिम मध्ये प्रथम- पुणे, द्वितीय- छ.संभाजीनगर तृतिय- नाशिक.

17 वर्षे मुले- रिकव्हर राऊंड- 60 मी- प्रथम- कृष्णा शिंदे (पुणे), शिवम चिकाळे (पुणे), सोहम कानसे (पुणे) 
60 मी- द्वितीय- शिवम चिकाळे (पुणे), सोहम कानसे (पुणे), अभिराज मनमोडे (अमरावती) 
ओव्हर ऑल- शिव चिकने (पुणे), सोहम कानसे (पुणे),ज्ञानेश चेरले (लातूर) तर टिम मध्ये प्रथम- पुणे, द्वितीय- अमरावती, तृतिय- नाशिक.
17 वर्षे मुली- रिकव्हर राऊंड- 60 मी- प्रथम- शर्वरी शेंडे (पुणे), गाथा खडके (पुणे), तनुजा कुलकर्णी (नाशिक) 
60 मी- द्वितीय- शर्वरी शेडे (पुणे), कुमकुम मोद, गाथा खडके (पुणे), ओव्हर ऑल- शर्वरी शेंडे  (पुणे), गाथा खडके (पुणे), कुमकुम मोद (पुणे) तर टिम मध्ये प्रथम- पुणे, द्वितीय- अमरावती, तृतिय- कोल्हापूर. 
19 वर्षे मुले- कम्पाऊंड राऊंड- 50 मी- प्रथम- आर्या प्रसाद (पुणे), द्वितीय- सिध्दी नगुलवार (कोल्हापूर), तृतिय- राशी गवई (कोल्हापूर) 

50 मी द्वितीय- आर्या प्रसाद  (पुणे), राशी गवई (कोल्हापूर), तृतिय- गौरी दावरी (पुणे), ओव्हर ऑल- आर्या प्रसाद (पुणे), राशी गवई (कोल्हापूर), सिध्दी नागुलवार (कोल्हापूर) तर टिम मध्ये प्रथम- पुणे, द्वितीय- कोल्हापूर तृतिय- नागपूर.
19 वर्षे मुले- रिकव्हर राऊंड- 70 मी- प्रथम- पृथ्वीराज घाडगे (पुणे), चिन्मय चुटे (नागपूर), पृथ्वीराज चव्हाण (लातूर) 
70 मी- द्वितीय- पृथ्वीराज घाडगे (पुणे), साईराज हानमे (क्रीडा प्रबोधीनी), कृष्णा सोनवने (नाशिक)
19 वर्षे मुली- रिकव्हर राऊंड- 70 मी- प्रथम- शर्वरी शेळके (पुणे), सायली माने (पुणे), वनसी कडवानी (पुणे) 
60 मी- प्रथम- वंनसी काडवनी (पुणे), सायली माने (पुणे), शरवरी शेळके (पुणे) असा आहे. 
सदर स्पर्धा श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम,नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूं, क्रीडाप्रेमी यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या