विद्यार्थ्याना मारहाण करणाऱ्या मनपा शाळा नं २९ मधील शिक्षिकेवर आयुक्तांनी कडक कायदेशीर कारवाई करावी : मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/10/2024 1:07 PM


सांगली प्रतिनिधी -: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचशीलनरातील शाळा नंबर २९ मधील इयत्ता चौथी आणि सहावीच्या वर्गातील 40 ते 45 विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेतील   शिक्षिकेनं  मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
      अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या या शिक्षिकेवर आयुक्त शुभम गुप्ता तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनी कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे.
           सदर शाळेमधील शिक्षकांमध्ये अंतर्गत वादातून हि मारहाण झाल्याची माहिती समोर येत असल्याने,या वादाचीही सखोल चौकशी आयुक्तांनी करावी अशी मागणीही भिसे यांनी केलीय.सदर शिक्षिकेवर कारवाई न झाल्यास शिक्षण मंत्र्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचा इशाराही यांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या