"सुधीरभाऊ रसे यांच्या संयमाच्या लढाईत खंजीर ची भूमिका"

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 20/10/2024 10:58 PM

अमरावती: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.परंतु या यादीतून अचलपूर मतदार संघातून संयमी,सामाजिक व राजकीय अस्तित्व असणारे मा.श्री सुधीरभाऊ रसे यांना बाजूला सारण्यात आले. सुधीरभाऊ रसे यांच्या अस्तित्व राजकीय व सामाजिक क्षेत्रात अचलपूर मतदार संघात सर्वांना माहित आहे. भाजपामध्ये जवळपास तीस वर्षापासून कार्यरत आहेत. अचलपूर क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती भाऊंच्या संयमाबद्दल व स्वभावाबद्दल त्यांच्या मदतीबद्दल सर्व समाजातील प्रत्येक प्रवर्गातील व्यक्तीला भाऊंबद्दल खूप चांगल्या पद्धतीने जाण आहे. प्रत्येक समाजातील प्रत्येक संघटनेला सुधीरभाऊ ने वेळोवेळी येणाऱ्या अडचणीला मदत करून प्रत्येक समाजात, जातीत एक वेगळीच क्रांती घडवून आणलेली आहे. यामुळेच अचलपूर मतदार संघातून जनसामान्य व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या विचारानुसार सुधीर भाऊ भावी आमदार होतील अशी अपेक्षा ठेवून प्रत्येक संघटना, प्रत्येक कार्यकर्ता सुधीर भाऊच्या पाठीशी ताठस्तपणे उभा आहे व असाच उभा राहील परंतु राजकीय खेळीनुसार सुधीर भाऊ च्या संयमाच्या लढाईत खंजिराची भूमिका खूप महत्त्वाची ठरली व यातच सुधीर भाऊचा मार्ग रोखण्यात आला.सुधीर भाऊंचे कार्य हे फक्त एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाकरता व सगळ्या जाती करता आहे ते फक्त एका जातीपूरते बंदिस्त नसून प्रत्येक समाजाकरता, जाती करता त्यांचे महत्त्व आहे. आजही त्यांच्या स्वभावामुळे प्रत्येक राजकीय पक्षातील कार्यकर्ते स्वतःहून सुधीर भाऊंच्या पाठीशी उभे आहेत व सुधीर भाऊला पूर्णता सहकार्य करण्यास तयार आहेत. तसेच काही पक्ष सुधीरभाऊला उमेदवारी देण्यास सुद्धा तयार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या