डेरवण रत्नागिरी येथे झालेल्या विभागस्तरीय मैदानी स्पर्धेत कुपवाड येथील *नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड संचलित सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक* विद्यालयाने सुयश संपादन केले.
*कु.समीक्षा राकेश तोडकर बांबू उडीमध्ये प्रथम क्रमांक तर कु. ऋतुजा रामहरी माने हिने चालणे मध्ये द्वितीय क्रमांक* मिळवला. या दोघींची *राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली* आहे सदर यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष मा. आण्णासो उपाध्ये सर उपाध्यक्ष मा. श्री सुरज उपाध्ये सर सचिव मा. रितेश शेठ,सर संचालिका सौ.कांचन उपाध्ये व डॉ. पूनम उपाध्ये मॅडम, तसेच मुख्याध्यापक शिरीष चिरमे सर.पर्यवेक्षक अनिल चौगुले सर यांचे प्रोत्साहन, तर *विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. सिद्धार्थ कांबळे व अभय चौगुले सर यांचे मार्गदर्शन लाभले.* कुपवाड परिसरात मुलींचे कौतुक होत आहे.