सांगली – चक्क शहर अभियंत्याच्या खोट्या सह्या करून ५० लाखांचा घोटाळा! सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत ठेकेदाराने खोट्या स्वाक्षऱ्या करून बोगस कामगिरी केली असल्याचे उघड झाल्यानंतर लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देऊन तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.
**हा ठेकेदार फक्त फसवणूकच करत नाही, तर महापालिकेचा आणि जनतेचा विश्वासघात करत आहे **,असे भिसे यांनी ठणकावले. त्यानुसार, त्यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची आणि त्याच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. "जर ठोस कारवाई झाली नाही, तर लोकहित मंच हा अन्याय थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरेल!" असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
आपला:
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली