"बालपणी वडिलांच्या खांद्यावर बसून येथे नाटकाचे प्रयोग पाहायला येत होतो, आज येथे '-नाशिक भूषण-' पुरस्कार स्विकारताना अत्यानंद होतोय.." - ``मा. अमोलजी भागवत``.

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 02/10/2024 9:34 PM

"बालपणी वडिलांच्या खांद्यावर बसून येथे नाटकाचे प्रयोग पाहायला येत होतो, आज येथे '-नाशिक भूषण-' पुरस्कार स्विकारताना अत्यानंद होतोय.." - ``माननीय अमोलजी भागवत``.
युवा ध्येय समूहातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ लेखक व संपादक उत्तमराव कांबळे अध्यक्षस्थानी उपस्थित होते, व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक दिनकर टेमकर, सिने अभिनेते ऋषी जोरावर, लेखक व तज्ञ दिनेश आदलिंग, शिक्षण अधिकारी अरुण धामणे, शिक्षण अधिकारी परसराम पावसे, शिक्षण तज्ञ सुनील बेनके, शिक्षणतज्ञ संदीपराव वाकचौरे, उद्योजक अण्णासाहेब सदगीर यांच्यासह युवा ध्येय समूहाचे प्रमुख माननीय लहानु सदगीर हे उपस्थित होते.
पुरस्कार सोहळ्यामध्ये तज्ञ समितीच शिक्षण क्षेत्राशी निगडित असल्यामुळे पुरस्कार देताना ••योग्य व्यक्ती, योग्य पुरस्कार•• हे तत्व प्रामुख्याने जोपासण्यात आले. 
याचवेळी सामाजिक क्षेत्र व प्रेरणा यांचा विचार करून नासिक तसेच महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात एक धडाडीचे कार्य उभे करत असलेल्या जनसेवक अमोल भागवत यांचा नासिक भूषण या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला व त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले गेले, तसेच नासिक आयकॉन म्हणून ज्येष्ठ समाजसेविका व तत्पर मार्गदर्शिका चेतना सेवकशर्मा यांना नासिक आयडॉल पुरस्कार देण्यात आला, त्याचबरोबर युवा प्रतिभावान दुर्गा सांगळे यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश प्राप्त केल्याबद्दल 'नासिक युवा भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार सोहळा दरम्यान उपस्थित असलेले सर्व नागरिक व काही पदाधिकारी यांना ज्येष्ठ लेखक व संपादक उत्तमराव कांबळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले, यावेळी बोलताना उत्तमराव कांबळे यांनी सामाजिक सद्यस्थितीवर अतिशय योग्य पद्धतीने आपले विचार मांडले. त्यानंतर दिनेश आदलिंग यांनी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या घडामोडी व त्या घडामोडींवर योग्य पद्धतीने कुठल्या दिशेने कार्यरत होऊन, यश प्राप्त करावे याबद्दल भाष्य केले. 
उर्वरित शिक्षण अधिकाऱ्यांनी जिथे साक्षात ज्येष्ठ लेखक उत्तमराव कांबळे उपस्थित असतील तेथे आमचे सुद्धा कर्तव्य आहे की जास्तीत जास्त वेळ आदरणीय सरांना देण्यात यावा आणि आमच्यासहित सर्वांना त्यांचे मार्गदर्शन लाभावे असे वक्तव्य केले.
यावेळी बोलताना सन्माननीय अमोलजी भागवत यांनी भावनिक शब्दामध्ये भूतकाळाला सर्वांसमोर दुजोरा दिला आणि हे स्पष्ट केले की ज्यावेळेस आपणास पुरस्कार भेटतो त्यावेळेस आपली जबाबदारी अधिक वाढलेले असते आपल्याकडच्या अपेक्षांमध्ये वृद्धी झालेली असते व या सर्वांसाठी कार्यरत राहणे हाच एकमेव उपाय आहे व तो आपण सतत जोपासतो, असे अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक ज्या ज्या वेळेस लाभतात त्यावेळेस अनुभवाच्या शिदोरी मध्ये वाढ होते, हे सांगताच उपस्थित त्यांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
त्यानंतर आयडॉल व महाराष्ट्र राज्यावर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या पुणे सातारा सांगली बीड नागपूर कोल्हापूर रत्नागिरी येथील समानार्थींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
#yuvaddhyeysamuh#

Share

Other News

ताज्या बातम्या