गहाळ झालेले 4.58 लाखांचे 30 मोबाईल हस्तगत करून मा. पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या हस्ते मूळ मालकांना परत;पोलीस ठाणे भाग्यनगर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/10/2026 10:25 AM

नांदेड :- जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ तसेच चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत भाग्यनगर पोलीस स्टेशन येथील विशेष पथकाने प्रभावी कामगिरी बजावत एकूण 30 अँड्रॉईड मोबाईल फोन शोधून हस्तगत केले असून, त्यांची अंदाजे किंमत ₹4,58,000/- इतकी आहे. आज दिनांक 13/10/2026 रोजी पोलीस ठाणे भाग्यनगर भेटीदरम्यान मा. शहाजी उमाप, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.

प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे भाग्यनगर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले होते. या पथकाने मोबाईलचे IMEI क्रमांक, उपलब्ध पोलीस अभिलेख तसेच CEIR प्रणालीच्या माध्यमातून गहाळ व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याची कार्यवाही केली. या तपासामध्ये विविध ठिकाणांवरून एकूण 30 मोबाईल (अंदाजे किंमत रु. 4,58,000/-) फोन शोधून हस्तगत करण्यात आले.

मा. शहाजी उमाप, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांनी पोलीस ठाणे भाग्यनगर येथील नियोजीत भेटीदरम्यान त्यांच्या हस्ते सर्व तक्रारदार व मूळ मालकांना त्यांचे मोबाईल सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले. मोबाईल हरविल्यामुळे निर्माण झालेली नागरिकांची आर्थिक व मानसिक अडचण दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याबद्दल नांदेड पोलिसांचे आभार मानले.

ही कामगिरी मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, मा. रामेश्वर वेंजने, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाणे येथील पोनि / संतोष तांबे, सपोनि / श्रीकांत इंगोले, बालाजी महाजन, अनुपमा केंद्रे, पोउपनि / विनोद देशमुख, सचिन सोनवणे, कोंडीबा केजगिर, नरेश वाडेवाले, संकेत सवराते, साहेबराव कसबेवाड तसेच पोलीस अंमलदार व्यंकट गंगूलवार, ममता गुळवे, व्यंकटेश सांगळे यांनी पार पाडली आहे.

नागरिकांनी मोबाईल हरविल्यास अथवा चोरीस गेल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. तसेच CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर मोबाईलची माहिती नोंदवावी. मोबाईलचा IMEI क्रमांक सुरक्षितपणे जतन करून ठेवावा, जेणेकरून मोबाईल शोधण्याच्या कार्यवाहीस त्याचा उपयोग होईल. नागरिकांच्या मालमत्तेचा शोध घेऊन ती परत मिळवून देण्यासाठी नांदेड पोलीस सदैव प्रयत्नशील आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या