विजयनगर चौक ते रेल्वे ब्रिज पर्यंतच्या गेले कित्येक वर्षापासून ची नागरिकांची मागणी होती की हा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात यावा त्याची आज कारवाई सुरुवात करण्यात आली महापालिका उपायुक्त अश्विनी पाटील अतिक्रमण विभाग अधीक्षक सचिन सावगावकर कुपवाड विभागीय कार्यालय सहाय्यक आयुक्त श्वेता सुर्वे महापालिकेचे आरोग्य विभाग नगर रचना विभाग चे अधिकारी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा अतिक्रमण स्थळी तैनात करण्यात आला आहे. विजयनगर अतिक्रमण कृती समितीचे मुनीर मुल्ला, नगरसेवक दीपक वायदंडे, नगरसेविका योगिता राठोड, राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष धोतरे, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील, प्रकाश पाटील, महेश साळुंखे जालिंदर फारणे.