शेटे महाविद्यालयात विशाखा समितीअंतर्गत आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 10/10/2026 12:08 PM

शेटे महाविद्यालयात विशाखा समितीअंतर्गत आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

​भगूर कॅम्प:

श्री एकनाथराव सहादू शेटे वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथे नुकताच विशाखा समिती अंतर्गत विद्यार्थिनींसाठी एका विशेष आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

​या कार्यक्रमात बिटको हॉस्पिटलमधील आरोग्य विभागाच्या कौन्सिलर सुजाता जेजुरकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थिनींना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तसेच सध्याच्या काळात वाढणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी केले. आपल्या मनोगतात प्राचार्यांनी विद्यार्थिनींना आजच्या धावपळीच्या युगात योग्य आहार घेण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच बाहेरील जंक फूड खाणे आरोग्यासाठी कसे हानिकारक ठरू शकते, याबाबत मुलींना मोलाचा सल्ला दिला.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सुप्रिया हंडोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका प्राजक्ता जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्याلاयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share

Other News

ताज्या बातम्या