प्रभाग क्रमांक २,दत्त मंदिर – चैतन्य नगर येथील रहिवासी सौ. मीनाक्षी सतीश घोरपडे यांच्या नजरचुकीने त्यांची अर्धा तोळा सोन्याची अंगठी रिक्षा घंटागाडीमध्ये पडली.
अंगठी हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रभागाचे मुकादम मा. संजय सरोदे यांना माहिती दिली. संजय सरोदे यांनी तत्काळ वाहनचालक कुमार शांताराम घाडगे व कर्मचारी सचिन युवराज सरोदे यांच्याशी संपर्क साधून अंगठी शोधण्यास सांगितले.
कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न करता घंटागाडीमध्ये अंगठीचा शोध घेतला आणि अंगठी मिळवून ती सौ. मीनाक्षी घोरपडे यांना सुखरूप परत केली.
आजच्या काळातही प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी जपणाऱ्या महानगरपालिकेच्या या कर्मचाऱ्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
अशा कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा मनापासून अभिमान आहे!
“कर्तव्य बजावताना माणुसकी जपणारे हातच खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करतात.” 🙏
#sunnydhotare #prajaktadhotare #smkc