सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये प्रत्येक घरासमोर केंद्र सरकारच्या कुठल्या तर नियमानुसार स्कॅनर ची पाटी बसवलेली आहे आता घंटागाडी वरचे कर्मचारी कचरा टाकताना सांगत आहे की जो स्कॅनर तुमच्या घरावर लावलेला आहे त्याचा स्टिकर तुम्ही तयार करून कचऱ्याच्या बादलीवर लावावा त्याशिवाय आम्ही कचरा घेणार नाही.
या माध्यमातून मा आयुक्त साहेबांना विनंती आहे की सदर ठेका देताना कोणत्या शर्ती अटी घालण्यात आल्या होत्या त्या मक्तेदाराने स्कॅनरचा स्टिकर देण्याचे ठरले होते किंवा नाही याबाबत खुलासा करावा.
कोणताही नागरिक स्वखर्चाने सदर स्टीकर तयार करून घेणार नाही ज्या कंपनीला ठेका देण्यात आला होता त्या कंपनीने प्रत्येक नागरिकांना घरी जाऊन स्टिकर देण्यात यावे कचरा घ्यायचा बंद केल्यास महापालिकेच्या दारात आम्ही कचरा आणून टाकणार आहोत.
रोग रेड्याला आणि इलाज कसा याला अशी म्हण याबाबतीत महापालिकेला लागू पडते
याबाबत तात्काळ महानगरपालिकेने खुलासा करावा अन्यथा आंदोलन अटळ आहे.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा