संबंधित विभाग व अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, लोकहित मंचची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/09/2025 11:24 PM

* *लोकहित मंचच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली एस. टी. स्टॅन्ड ते कोल्हापूर रोडच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवून प्रशासनाला याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला गेला. एखाद्या निष्पाप  नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा सवालही लोकहित मंचच्या वतीने उपस्थित करण्यात आला होता. आणि आज झालेही तसेच. काही वेळापूर्वी या रोडवरील खड्ड्यामुळे एका निष्पाप भगिनीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.                   सार्वजनिक बांधकाम आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने संबंधित विभागांसह संबंधित अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही लोकहित मंचाच्या  वतीने करत आहोत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे*                     
 
.*मनोज भिसे अध्यक्ष,लोकहित मंच*

Share

Other News

ताज्या बातम्या