आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
फलटण:
सांगवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. सांगवी शताब्दी महोत्सवानिमित्त सोसायटीने शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण केल्यानिमित्त आयोजित शताब्दी महोत्सव सोहळ्यास ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांनी उपस्थित राहून सोसायटीचे पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ माता_भगिनी तसेच सहकार चळवळीतील पदाधिकारी मान्यवर कायर्कर्त्यांशी संवाद साधून शताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या शताब्दी महोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य महिला शेतकरी मेळावा, पु. ना. गाडगीळ अँड सन्स व पी. एम. डी. मिल्क अँड प्रोडक्ट्स तर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप व नोंदणीकृत बांधकाम कामगार कार्ड लाभार्थ्यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या शताब्दी महोत्सव कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार मा. श्री. रणजितसिंह नाईक_निंबाळकर ,सौ. जिजामाता नाईक_निंबाळकर , फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सचिन कांबळे पाटील,मा. श्री. प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील, मा. श्री. शिवरूपराजे खर्डेकर , मा. श्री.विश्वासराव भोसले, मा. श्री. माणिकराव सोनवळकर, मा. श्री. विलासराव नलवडे, मा.श्री. लक्ष्मणराव सोनवलकर , मा.श्री. अमित रणवरे, बापूराव शिंदे,मा. श्री. नानसो (पिंटू) इवरे, मा. श्री. जे.पी. गावडे, मा. श्री. निलेश इतापे, ,मा. श्री.सुशांत निंबाळकर, कार्यक्रमाचे संयोजक मा. श्री. हणमंतराव मोहिते, मा. श्री. प्रदीप मोहिते, सांगवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. सांगवी चे आजी माजी चेअरमन, व्हाइस चेअरमन , सर्व संचालक शेतकरी बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..