गाडी क्रमांक 014 51/52 कोल्हापूर मिरज कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस ही गाडी 24 सप्टेंबर 2025 पासून सकाळच्या सत्रामध्ये सुरू होत असून शुक्रवार वगळता ही गाडी दररोज सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी मिरज येथून कलबुर्गी साठी निघेल व दुपारी अडीच वाजता सोलापूर येथे पोहोचेल व चार वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल या गाडीस सहा स्लीपर व चार थ्री टिअर ऐसी व सहा जनरल कोच असल्याने त्या गाडीची बुकिंग 16 सप्टेंबर पासून सुरू होत आहे.ही गाडी मिरज ते कुर्डुवाडी दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल तरी या गाडीचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले आहे.
या गाडीत माढा, मोहोळ, अक्कलकोटरोड, दुधनी, गाणगापूर रोड या ठिकाणीही थांबा देण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव सोलापूर विभागाकडे पाठवल्याचे मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितले व यास रेल्वे प्रशासनाकडून दुजोरा ही मिळाल्याचे ही सांगितले.
परतीच्या प्रवासासाठी ही गाडी कलबुर्गी हुन संध्याकाळी सहा वाजुन दहा मिनिटांनी सुटेल व सोलापुर येथुन रात्री साडेआठ वाजता निघेल व मिरज येथे पहाटे तिन वाजता पोहचेल.