तेढ निर्माण करून मग प्रश्न सोडवायचे हा प्रकार बंद व्हायला हवा : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/09/2025 11:20 AM

गेली दोन दिवस झाले महापालिका इमारतीला लागून असलेल्या प्रतापसीह उद्यानाच्या बाहेर गेल्या कित्येक दशकापासून भेळ च्या गाड्या लागलेल्या असतात त्याचा कोणताही अडथळा वाहतुकीला अथवा चालत जाणाऱ्या नागरिकांना होत नाही 
मागे उपायुक्त मोसमी बर्डे यांनी सुद्धा कारवाई करायचा प्रयत्न केला तो हाणून पाडला गेला आत्ता आयुक्त मा सत्यम गांधी यांनी सदर गाड्या हलवण्याबाबत कार्यवाही चालू केली आहे 
कोणतीही कारवाई करताना कोणत्या पद्धतीने केली गेली पाहिजे किंवा कसे सामोरे गेले पाहिजे काय पद्धत असावी हे आम्ही महानगरपालिका प्रशासनाला सुचवणे म्हणजे शहाणपण सांगितल्या गत होईल .
मा आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी घंटागाड्या लावा अतिक्रमांच्या गाड्या लावा हा सल्ला कोणी दिला याचा तपास करणे गरजेचे आहे.
सनदशीर मार्गाने चर्चा करून चर्चेतून सुद्धा मार्ग निघू शकतो मात्र चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी घंटागाड्या पार्किंग करणे महापालिकेच्या गाड्या रस्त्यावर आणून लावली हा प्रकार म्हणजे घृणास्पद प्रकार आहे याचा एक सांगलीकर नागरिक म्हणून जाहीर निषेध आहे.
मा.साहेबांना विनंती आहे आपण सदर भेळची गाडी वाले असतील फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी असतील यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचे पुनर्वसन करून मार्ग काढावा अशी विनंती आहे.
प्रत्येक गोष्टीत तेढ निर्माण होईल वाद निर्माण होईल मग प्रश्न सुटेल असे करण्याचे काहीही कारण नाही. 
तसेच राष्ट्रीय फेरीवाला धोरण याबाबत अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी अशी विनंती आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या