*मिरज/नागपूर*- महाराष्ट्रभर विस्तार असलेल्या देवाभाऊ फाउंडेशनच्या सांगली जिल्हा समन्वयक पदी भाजपचे सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांची नियुक्ती करण्यात आली.
नागपूर येथून देवाभाऊ फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य समन्वयक श्री गजानन जोशी यांनी संघटक सहसमन्वयक डॉक्टर आशुतोष घोलप यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची आज नियुक्ती केली.
भारतीय जनता पार्टीच्या कामातून तसेच इतर सामाजिक कामातून ओंकार शुक्ल यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांची ही नियुक्ती केल्याचे मुख्य समन्वयक श्री गजानन जोशी यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गरजूंना वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनेतून सेवा दिली जाते ती लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच इतर जनजागृतीचे उपक्रम राबवण्याचे काम ही संस्था करते.
देवाभाऊ फाउंडेशन येत्या तीन महिन्यात दहा हजार कुटुंबापर्यंत पोहोचवणार असल्याचे जिल्हा समन्वयक ओमकार शुक्ल यांनी सांगितले.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.