सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे येत्या सप्टेंबर अखेर सुरु

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 16/09/2025 8:13 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा, दि.: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे येत्या सप्टेंबर अखेर सुरु करावेत. जी कामे प्रगतीपथावर आहेत ती कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी. तसेच जी कामे सुरु करावयाची आहे ती कामे माहे मे पर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विविध पर्यटन विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी घेतला. या आढावा बैठकीला उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, कार्यकारी अभियंता श्रीपात जाधव, राहूल अहिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांचा आढावा घेतला जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, कामांसाठी ज्या ज्या विभागाचे ना हकरत प्रमाणपत्र घ्यावयाचे आहे त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. काही कामांमध्ये अडचणी येत आहे या अडचणी दूर करण्यासाठी काम घेतलेल्या एजन्सीसोबत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामावर भेट देऊन अडचणी दूर कराव्यात.

अजिंक्यतारा किल्ल्याच्या जतन, संवर्धन, पसिराच्या सुशोभीकरण व पायाभूत सुविधेचा आराखडा, संगम माहुली व क्षेत्र माहुली येथील सुशोभीकरणाचा आराखडा, तळबीड ता. कराड येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्य सृष्टी आराखडा व कराड येथील प्रितीसंगम सुशोभीकरणाचा आखडा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी पाहून येथील आरखड्याच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या