अक्षय सोनवणे व त्यांच्या स्टाफ ने वाळू चोरांच्या केल्याबत्त्या गुल

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 09/05/2025 1:06 PM

 


 पाच लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत 

आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)


दहिवडी दि:म्हसवड ता. माण येथील माण गंगा नदीच्या पात्रातून  एक पांढऱ्या रंगाच्या पिकअप टेम्पोमध्ये  वाळू भरून चोरटी वाहतूक करत असल्याची गोपनीय खबर्याकडून खात्रीशीर माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी आपली गतिमान चक्र फिरवून म्हसवड बाजू कडून माने वस्तीकडे जाणाऱ्या  रोडवर मल्हार नगर येथील समाज मंदिराशेजारी  पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये चोरटी वाळू भरलेली दिसून आली.

 म्हसवड पोलीस ठाण्यात वाळू चोर कुलदीप संपत माने राहणार माने वस्ती याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप टेम्पो , वाळू असा 5 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध रित्या  वाळू चोरी करणाऱ्या  वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत.
ही कामगिरी  जिल्हा पोलीस अधीक्षक  समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे यांनी केली आहे.


 : म्हसवड परिसरात पोलिसांचा वाळू चोरांना चपराक मात्र स्थानिक तलाठी सर्कल करतायत तरी काय आत्तापर्यंत म्हसवड पोलिसांनी जवळपास तीन ते चार कारवाई केल्या तरी  महसूल प्रशासन गांदरेच्या भूमिकेत का?  अशा चर्चेला म्हसवड परिसरात ऊत आला आहे.

 : एपीआय अक्षय सोनवणे  स्टाफ सह कुलदीप माने
                   

Share

Other News

ताज्या बातम्या