महात्मा गांधी चौक मिरज पोलिसांचे लोकहित मंचकडून कौतुक व अभिनंदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2025 9:24 PM

     मिरज शासकीय रुग्णालयातून गेल्या दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेने तीन दिवसाचे नवजात अर्भक पळवल्याची धक्कादायक घटना घडली होती या संदर्भात मिरज मधील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तपासात गुंतले होते तब्बल 48 तासानंतर या पोलिसांना सदर महिलेस अटक करण्यामध्ये यश आले आहे. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून कार्य तत्परता दाखवत अथकपणे तपास सुरू ठेवल्याने या महिलेच्या मुस्क्या आवळण्यामध्ये पोलिस यशस्वी झाल्याने मी लोकहित मंचचा अध्यक्ष या नात्याने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील  सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदेसाहेब आणि त्यांच्या साऱ्या टीमचे  हार्दिक हार्दिक अभिनंदन!

Share

Other News

ताज्या बातम्या