भारती हॉस्पिटल ते विश्रामबाग चौक रस्याच्या कामाबाबत जनहित याचिकेसह सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे तक्रार करणार : मनोज भिसे लोकहित मंच अध्यक्ष

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/05/2025 5:42 PM

 सांगली प्रतिनिधी 
                   सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या डोळ्यात धुवून घेतली जात असून, सुस्थितीतील रस्त्यावरच पुन्हा कार्पेट टाकून डांबरीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे. यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये निधी खर्च केला जाणार असल्याने याबाबत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे मेल व कीड पोस्टाद्वारे निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे. त्याचबरोबर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनाही या संबंधात निवेदन देण्यात आले आहे.
             विश्रामबाग ते भारती हॉस्पिटल हे अंतर तीन ते सव्वा तीन किलो मीटर  असून हा रस्ता अगदी सुस्थितीत आहे. मात्र या रस्त्यावरच पुन्हा एकदा डांबरीकरण करण्यात येत असून, हे डांबरीकरण रस्ता न उकरताच त्यावर फक्त कार्पेट टाकून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेक नागरिकांच्या कडून विचारला जात असल्याने लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे.
        या रस्त्यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च येणार असून सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावर एवढा मोठा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून का खर्च केला जातोय? का फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांना पोसण्यासाठी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या टक्केवारीसाठीच हा प्रताप केला जातोय का? असा प्रश्नही मनोज भिसे यांनी व्यक्त केला आहे 
     सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक खराब रस्ते असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाला ते रस्ते दिसले नाहीत का? या विभागाला अशा रस्त्यांची माहिती नसेल तर लोकहित मंच अशा रस्त्यांची फोटोसह माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसह सांगली सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यायला तयार असल्याचेही भिसे यांनी म्हटले आहे.
       फक्त कार्पेट अंथरण्यासाठी प्रति किलोमीटर ला दोन कोटी इतका खर्च येतो का? या संबंधातही माहिती घेऊन, गरज भासल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग सांगलीच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही लोकहित मंचेचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या