कुपवाड पंचकल्याण पूजेत आज सातव्या दिवशी नित्यविधी सह मूलनायक श्री 1008 भगवान आदिनाथ महामंडल विधान व चक्रेश्वरी देवी आराधना एवंम कुंकुंम अर्चन विधी पार पडले.
कुपवाड पंचकल्याण पूजेच्या मंगळवारी सातव्या दिवशी पहाटे मंदिरात मंगलवाद्य घोष व मंगलाचरण झाले. त्यानंतर इंद्र इंद्रायणी यांचे सहवाद्य मंडपात आगमन झाले. जलकुंभ मिरवणूक निघाली. ज्याप्याअनुष्ठान नित्य क्रिया पार पडल्या.त्यानंतर मूलनायक श्री 1008 भगवान आदिनाथ महामंडल विधान प्रारंभ झाले. यावेळी चक्रेश्वरी देवी आराधना होऊन कुंकुंम अर्चन,ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडले. या आदिनाथ महामंडल विधानात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. दुपारच्या सत्रात आचार्य संघाचे गुरुपूजन, संघ पूजन, विद्वानांचा सन्मान पार पडले. केवल ज्ञान कल्याणक तिथी पुजन व आचार्य श्री जिनसेन जी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले. सायंकाळी जिनवाणी मिरवणूक, देव शास्त्र गुरू आरती सवाल पार पडले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व आरती झाले.
यावेळी मंदिरासाठी व पंचकल्याण पूजेसाठी वेगवेगळ्या स्वरूपात विशेष योगदान दिलेले पि. टी. पांडियन. सौ. निवेषा पांडियन. वास्तुशिल्प तज्ञ व वास्तू गणिततज्ञ राजेंद्र जैन. अभिजीत कोल्हापुरे. बाळासाहेब रामगोंडा पाटील. बाळासाहेब हिंदुराव पाटील. माणिक भाऊसाहेब पाटील. शशिकांत हिंदुराव पाटील. शांतगोंडा बाळगोंडा पाटील. संजीवनी सातगोडा पाटील. आदींचा मंदिर विश्वस्त चंद्रकांत पाटील. अनिल पाटील. महेंद्र कुमार पाटील. कॅप्टन भालचंद्र पाटील. बाळासाहेब हिंदुराव पाटील. बाळासाहेब ने पाटील. माणिक पाटील. शीतल पाटील. प्रफुल्ल पाटील. यांच्यासह पूजा समिती आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी सौ स्वरूपा राजेंद्र यड्रावकर, प्रमिला मुरगुंडे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, माजी नगरसेवक गजानन मगदूम,किरण वांजुळे, भाजप जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील,रवींद्र सदामते, माजी उपमापोर मोहन जाधव,वीराचार्य पतसंस्था संचालक मोहन लांडे यांनी पंचकल्याण पूजेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.