अमित कुकडे आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्काराने सन्मानित

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 05/05/2025 2:52 PM

  


आरटी आय न्यूज नेटवर्क 
विजय जगदाळे 

  दहिवडी दि:माण तालुक्यातील पिंगळी गावचे  ग्राम महसूल अधिकारी म्हणून काम करणारे अमित कुकडे यांनी प्रशासनाचा गाव पातळीवरील केलेले काम पाहता प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महसूलचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या उपस्थितीत आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार देऊन अमित शांताराम कुकडे यांना सन्मानित करण्यात आले. 
      यावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी उज्वला गाडेकर तहसीलदार माण विकास आहिर, नायब तहसीलदार ढोले मॅडम, 
शेंडे सर  ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी अमित कुकडे यांचा सत्कार व अभिनंदन केले. 
    अमित कुकडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून माण तालुक्यातील आंधळी, पिंगळी,महिमानगड, पांढरवाडी, स्वरूपखानवाडी  यासारख्या दुष्काळी गावात नोकरी करून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच  मराठा सर्वेक्षण, ऍग्री स्टॅक योजनेची माहिती, ई-पीक पाहणी अशा प्रशासनाच्या विविध योजनेची माहिती शेतकऱ्यांना देऊन संबंधित योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. 
    या कामाचे महसूल व वन विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी  पुरस्कार व त्याबाबतचे प्रमाणपत्र पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. 
     या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या