प्रभाग १८ मध्ये अपुरा व अळीमिश्रित पाणीपुरवठा, सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा आयुक्तांचा शैलेश पवार यांना शब्द

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/05/2025 12:25 PM

आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांच्या आदेशाने प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची कमतरता आणि आळ्या मिश्रित पाणी नळाला येत असलेल्या  पाण्याचा नमुना घेऊन आज सन्माननीय आयुक्तांची महिला आणि नागरिकांसह शैलेश (भाऊ) पवार यांनी भेट घेतली. सर्वप्रथम त्यांचे स्वागत केले. आणि पिण्याच्या पाण्याचा बाटली मधून पुराव्यासहित पाण्याच्या सध्याच्या परिस्थितीचा नमुना दाखवला. महानगरपालिका प्रशासन पाणीपट्टी वेळेत वसूल करत असते आणि नागरिकांना स्वच्छ पाणी वेळेत मिळत नाही. अशी खंत शैलेश (भाऊ) पवार यांनी आयुक्तांसमोर मांडली. नागरिकांनी अनेक वेळा वॉटर वर्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सतत पाठपुरावा केला असताना सुद्धा हा प्रश्न आज अखेर सुटला नाही. प्रभाग क्रमांक 18 मधील परिसरात अनेक ठिकाणी पाण्याची प्रचंड स्वरूपात गळती होत आहे. करोडो लिटर पाणी वाया जात आहे. त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन करणे गरजेचे आहे. यासाठी सातत्याने पुराव्यासह स्थानिक वॉटर वर्क्स अधिकाऱ्यांना मागणी करून सुद्धा स्थानिक प्रशासन लक्ष देत नाहीत याची जाणीव शैलेश (भाऊ) पवार यांनी आयुक्तांना करून दिली. प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटावा यासाठी आज प्रयत्न केले. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून याचा लवकरच पाठपुरावा केला जाईल आणि प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी मिळेल अशी नागरिकांसमोर शैलेश (भाऊ) पवार यांना शब्द दिला. याबाबत शैलेश (भाऊ) पवार यांचे प्रभागातून समाधान व्यक्त होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या