सांगली प्रतिनिधी-
मिरज मधील शासकीय रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात अर्भक एका अज्ञात महिलेने पळवल्याची धक्कादायक घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधित महिलेला कथोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कविता समाधान आलदर ही सांगोला तालुक्यातील महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झालीय. दोन दिवसाच्या तोंड ओळखीचा फायदा घेत अलदर यांच्या पुरुष जातीच्या नवजात अर्भकाला प्रसूती विभागात 11 वाजता एक अज्ञात महिलेने येऊन 16 नंबर येथे लस देऊन आणण्याचा बहाण्याने बाळाला घेऊन पसार झाली आहे. बाळ परत घेऊन ती महिला लवकर आली नसल्याने शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याचा हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेमुळे सुरक्षा चव्हाट्यावर आली असून . सध्या रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था आहे ती सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र या नात्याकारणाने अडवून त्यांची चौकशी करतात मात्र अशावेळी ते आपली कार्यतत्परता विसरतात का? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या घटनेला सर्वस्वी सुरक्षा व्यवस्था आणि हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याने तात्काळ तपास चक्रे हलवून सदर मूल सुरक्षितपणे त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात यावे. यासाठी चौकशी समिती नेमून तपास करावा. अन्यथा या प्रकरणा विरोधात नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही लोकहित मंचच्यावतीने देण्यात आला आहे.
नवजात बालक अपहरण प्रकरणीची सखोल चौकशी व्हावी या संदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांच्याकडे मागणी केली