सांगली जिल्हयातील विविध प्रश्नाबाबत नागरिक जागृती मंचकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/05/2025 12:04 PM

प्रति 
मा.नाम. शिवेंद्रराजे भोसले 
सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य 

विषय: - सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आमच्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामाबाबत 

महोदय 

सांगली शहरात आपले सहर्ष स्वागत 
राज्यातील महायुतीच्या सत्तेमध्ये आपण मंत्री व्हावेत अशी आमच्या नागरिक जागृती मंचची फार मोठी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे 
सांगली जिल्हा व सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपणाकडून आम्ही विविध मागण्या करत आहोत त्याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून मार्ग काढावा अशी आपणास विनंती आहे 

1) गेल्या कित्येक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय मंडळ ऑफिस (एसी ऑफिस) सांगली मध्ये होण्याबाबत आम्ही मागणी करत आहोत त्याबाबत आपणाकडून कार्यवाही व्हावी 

2) तसेच सांगली शहरातून जुना सातारा रस्ता हा चार पदरीकरण होणे आवश्यक आहे जेणेकरून मुंबईला जाणारी वाहतूक विभागली जाईल व प्रवास सुखकारक होईल 

3) सांगली आणि मिरज शहरांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था दयनीय झाली आहे त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट करण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा सदर पूल धोकादायक आहे असे निष्पन्न झाले आहे 
सदर पुलासाठी आपल्या विभागाकडून तात्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी विनंती आहे 

4) सांगली शहरासाठी डीपी रोड मधील प्रस्तावित बाह्यवळण रस्ते प्रलंबित आहेत त्यासाठी सुद्धा आपल्या विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला तर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे 

5) सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे त्यासाठी डीपीआर तयार करून काही ठिकाणी उड्डाणपूल तर काही ठिकाणी अंडरपास करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी 

6) तसेच कोल्हापूर सातारा रोड चे काम राष्ट्रीय महामार्ग तर्फे चालू आहे ते सदर काम फार रेंगाळलेले आहे त्याबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करून सदर काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणा आदेश द्यावेत अशी विनंती आहे 

अजून बरेचशे प्रश्न आहेत तूर्त वरील प्रश्नाबाबत आपणाकडून संबंधित यंत्रणा योग्य ते आदेश व्हावे व सांगली जिल्ह्यासाठी भरघोस नीधी उपलब्ध व्हावा अशी आपणास पुनश्च एकदा विनंती आहे 

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या बाबत नागरिक जागृती मंचाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.नाम. शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले 
यावेळी शुभम चव्हाण व इतर उपस्थित होते 
यावेळी मंत्री महोदय आणि तुमच्या मागण्यांचा योग्य विचार करून कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देऊ असे आश्वस्त केले

Share

Other News

ताज्या बातम्या