मिरज महाविध्यालय मिरज आता "लोकनेते शरद पाटील महाविध्यालय" नावाने ओळखले जाणार , नामांतरास शिवाजी विध्यापीठाची मान्यता

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/04/2025 3:59 PM

मिरज महाविद्यालय, मिरज च्या नावात बदल करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. आता हे कॉलेज "लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालय" अशा नावाने ओळखले जाईल. आपले नेते माजी आमदार शरद पाटील सर यांनी 1993 ला मिरज शहर व मिरज ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी या कॉलेज ची स्थापना केली. इंजिनीअरिंग अथवा मेडिकल कॉलेज सुरु करण्याची संधी असूनही सरांनी गरिब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे या हेतूने आर्टस् व सायन्स शाखा सुरु करुन नंतर कॉमर्स विभाग हि सुरु केला. आज कॉलेज चे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवत आहेत.
कॉलेजला "लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालय" असे सार्थ नाव देण्यास मान्यता दिल्याबद्दल शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे मनापासुन आभार.

Share

Other News

ताज्या बातम्या