धनुर्विद्या शूटिंग रेंजचे उद्घाटन करून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊंनी धनुष्य हातात घेऊन धरला नेम.

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 26/04/2025 8:02 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सोलापूर दि:अरण जिल्हा सोलापूर येथील संत सावता माळी विद्यालयात धनुर्विद्या शूटिंग रेंजचे उद्घाटन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मा.श्री.जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी धनुष्यबाण हातात घेऊन समोरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याचा प्रयत्न करत खेळाचा आनंद लुटला व विद्यार्थी खेळाडूंसोबत संवाद साधला.
"भगवंताच्या कृपेने भारतात संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या १४ विद्या ६४ कला आहेत. त्यापैकी एक म्हणजे धनुष्य बाण चालवण्याची "धनुर्विद्या". धनुर्विद्येमुळे एकाग्रता, धैर्य, शारीरिक व मानसिक संतुलन, शौर्य, चिकाटी, चपळता वाढते आणि मानसिक तणाव / डिप्रेशन कमी होते.
संत सावतामाळी विद्यालयात आजच्या युवा पिढीला धनुष्य बाण शिकायची संधी मिळत आहे ही आनंदाची बाब आहे."जूनियर राष्ट्रीय धनुर्विद्या चॅम्पियन स्पर्धेत संत सावता माळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत त्याबद्दल जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले.
यावेळी दुग्धविकास ,अपारंपारिक ऊर्जा, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे,आमदार अभिजीत पाटील,भारत शिंदे,माऊली हळणवर, हरिभाऊ गावंधरे, सावता घाडगे सर, गणेश राऊत सर , सतीश घाडगे सर, बंडू घाडगे, सावता माळी विद्यालयामधील खेळाडू विद्यार्थी व आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या