*सांगली /प्रतिनिधी : सांगलीतील गणेश नगर पाचवी गल्ली अक्षय डाग्नोस्टिक सेंटर समोर जवळ काही दिवसापूर्वी पाण्याची पाईप लिकेज झाली होती ती पाईपलाईन दुरुस्ती करून झाले असून तेथील खड्डात जैसे ती तैसे स्थितीत होता सदरचा खड्डा मोठा आहे सदरच्या रोड वरती मोठ्या प्रमाणात वाहतूक असते नागरिकांची पण ये- जा मोठ्या प्रमाणात असते सदरच्या रोडवरती बुधवारचा बाजार भरतो मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये -जा असते याबाबत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती यांनी तरी या गोष्टीकडे गंभीर घेऊन पाणीपुरवठा विभागाने हा खड्डा आज त्वरित मुजवला. महानगरपालिकेचे नूतन आयुक्त मा. सत्यम गांधी यांनी नागरिकांचे तक्रार निवारण आणि जनता दरबार नागरिकांची सुसंवाद हा चांगला उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांचे लोकहित मंचावतीने आभार मानण्यात आले त्याने सुद्धा या खड्ड्याची त्वरित दखल घेतली या भागातील स्थानिक नागरिक सतिश बनसोडे, आणि सतीश कर्नाळे यांनी या खड्ड्याबाबत लोकहित मंच कडे संपर्क साधला होता हा खड्डा त्वरित मुजवण्यात यावा अशी मागणी केली होती. सांगली मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ साहेब, सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे साहेब, सांगली पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी चिदानंद कुरणे साहेब, पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील साहेब, सांगली पाणीपुरवठा विभागाचे नळनिरीक्षक मनराज साळुंखे या सर्वांचे लोकहित मंचावतीने आभारी मानले.
*मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली*