सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/04/2025 8:32 PM

विले-पार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदीर मुंबई महापालिका प्रशासनाने पाडल्याच्या निषेधार्थ आज सकल जैन समाज सांगलीच्या वतीने मा. कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या आक्रोश मोर्चात  पृथ्वीराज पाटील, खा विशाल पाटील मा मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर , रावसाहेब पाटील आदी मान्यवर व प्रचंड संख्येने जैन समाज सहभागी झाला होता. मंदीर पाडले प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व आहे त्याच ठिकाणी मंदिर बांधून द्यावे ही सकल जैन समाजाने मागणी यावेळी केली.

Share

Other News

ताज्या बातम्या