सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत
आपल्या सांगली शहरात पोहायला शिकणारी लहान मुले मुली मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीत पोहायला येतात.
मागच्या आठवड्यात शरद जाधव यांच्यावर मगरीचा हल्ला झाला आम्हाला वाटले नदीतील पोहणाऱ्यांची संख्या कमी होईल मात्र सांगलीकर मगरीला जुमानतील ते कसले...
ह्या माध्यमातून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच मनपा अग्निशामन विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे दोन महिने आपल्या नदीपात्रात बोटी सोडून सकाळच्या वेळेत गस्त ठेवावी जेणेकरून लहान मुले जी पाहुण्याला येतात त्यांच्यावर कोणते संकट येणार नाही व प्राण्यांनाही त्रास होणार नाही.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.