कुमार हसुरे नगर येथील रस्त्यांची दुरावस्था, मनपा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/04/2025 10:50 AM

कुमार हसुरे नगर येथील रस्त्याच्या दुरावस्थेने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. ड्रेनेज कामासाठी रस्ता खोदल्याने व नुकताच पाऊस पडून गेल्याने येथील नागरिक मरण यातना भोगत आहेत.

वास्तविक ड्रेनेज काम झाल्यावर परत रस्त्याचे काम होणे अपेक्षीत आहे. पण तसे न झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
तोंडावर पावसाळा आहे तरी त्यापूर्वी येथील रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी रतन तोडकर, योगेश नाझरे, रुपेश ढेरे, किरण कवडे, जयवंत खोत, सचिन कोठावळे, शंकर हजारे, शशिकांत वाघमोडे, अतुल भोरे, रमेश जाधव यांनी केली आहे. तरी  मनपा प्रशासन व इच्छुक नगरसेवक यांनी हा प्रश्न त्वरीत निकाली काढावा अशी मागणी रमेश जाधव यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या