विद्वात्ता ही कुठल्या शिक्षितांच्या कुशीतचं नसून . ..अज्ञानाच्या अंधःकारात असलेल्या, अठरा विश्व् दारिद्र्य, मेंढपाळ व्यवसायावर गुजरान करणाऱ्या, संघर्षच्या मुशीत घडलेल्या मेंढपाळपुत्र IPS बिरूदेव डोणे यांनी हा प्रत्यय महाराष्ट्राला दिला. ....
लहानपणापासून गाव खेड्यामध्ये शिक्षण घेऊन, जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना शिरावर घेऊन बिरूदेव स्वतःला सिद्ध करत राहिला. ...महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी स्वायत संस्थेमध्ये अग्रक्रमी असणाऱ्या COEP मधून अभियांत्रिकी पदवी घेऊन बिरूदेव स्वस्त बसला नाही. ....
आपल्या अनेक पिढ्या या भटकंतीत गेल्यावर भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा जिद्दी मानस उराशी बाळगून प्रयत्न करत राहिला अन IPS पदाला गवसणी घातलीचं. .....
आज महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून या मेंढपाळ पुत्रावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय, हे यश बिरूदेवचे नसून या महाराष्ट्रातील अशिक्षित, वंचित, पीडित, भटकंती करणाऱ्या आणि शोषित पोरांना संघर्षमय यशाचा नवा अध्याय आहे. ...
IPS बिरूदेव डोणे साहेब आपणास खूप खूप मनस्वी शुभेच्छा आणि भावी वाटचालीसही सदिच्छा. .....