सांगली: *मंगळवार, दि. २२ एप्रिल, २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे क्रूर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात देशातील अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. यात दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तींचाही समावेश होता
मृत्युमुखी पावलेल्या देश बांधवांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज ,युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मारका समोर कँडल लावून सर्व पदाधिकारी यांच्या कडून मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पक्षाचे सांगली शहराध्यक्ष सागर घोडके ,ज्योती अदाटे ,तानाजी गडदे,उत्तम कांबळे, शेडजी मोहिते,मुस्ताकअली रंगरेज ,अभिजित भोसले, आयुब बारगिर ,रज्जाक नाईक , डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे, संदीप व्हनमाने ,विजय माळी, सुरेश बंडगर, वैशाली धुमाळ, संगिता जाधव,इर्शाद पखाली,शितल खाडे ,डॉ सतीश नाईक,अजित दुधाळ,अकबर शेख,आकाराम कोळेकर,फिरोज मुल्ला, अक्षय अलकुंटे,नंदकुमार घाटगे, विजय पाटील, चंद्रकांत नाईक ,राहुल यमगर आदी उपस्थित होते.