मिरज शासकीय दुध डेअरी ची सध्याच्या परिस्थितीचे श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, नागरिक जागृती मंचची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2025 6:57 PM

प्रति
मा. जिल्हाधिकारी 
सांगली जिल्हा 

विषय: - सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील मिरज शासकीय दुध डेअरी च्या सध्याच्या परिस्थितीचे श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याबाबत 

महोदय 

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मिरज शासकीय दुध डेअरी ची जागा किमान 58 एकर आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून मिरज शासकीय दूध डेरी बंद अवस्थेत आहे ती चालू करावी किंवा सध्याच्या परिस्थितीत ते शक्य आहे किंवा अशक्य आहे याबाबत तर्कवितर्क चालू आहेत मात्र प्रशासकी कार्यालय सोडल्यास सदर जागा ही पडून आहे 
मध्यंतरी स्थानिक वृत्तपत्रातून व समाज माध्यमातून सदर जागेचा बाजार झाला असून सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय ुढार्‍यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या शैक्षणिक संस्था अथवा सामाजिक संस्था साठी सदर जागा मागितले आहे याबाबतची सर्व माहिती सार्वजनिक करण्यात यावी अशी विनंती आहे .
तसेच मंत्रालयीन स्तरावर सदर जागेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न चालू आहेत त्याची सुद्धा माहिती सार्वजनिक करण्यात यावी.
अथवा सदर जागा अजूनही शासनाच्या ताब्यात असल्यास त्याबाबतचा जाहीर खुलासा करावा 
तसेच कोविड-19 नंतर मेट्रोसिटी सोडून इतर शहरातून आयटी क्षेत्रासाठी मागणी होत आहे आपल्या सांगली जिल्ह्यात सुद्धा आयटी क्षेत्र विकसित करण्यासाठी आम्ही असो वेगवेगळे राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी असतील हे मागणी करत आहे त्यासाठी मनपा क्षेत्रातील मोक्याची जागा म्हणजे मिरज शासकीय दूध डेरी आहे त्यामुळे सदर जागा ही आयटी क्षेत्रासाठी रिझर्व करण्यात यावी यासाठीचा प्रस्ताव आपले स्तरावरून शासनाला पाठवण्यात यावा अशी विनंती आहे.
तसेच सदर 58 एकर क्षेत्राचे सर्वे नंबर सध्याचे उतारे व सध्याचे फेरफार हे सार्वजनिक करून त्याची शेत पत्रिका काढण्यात यावी अशी विनंती आहे.


सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या